माझा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला बघून घेईन, लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरूणीचा दम


माझा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला बघून घेईन, लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरूणीचा दम
SHARES

''मला लोकल ट्रेनमधून पडताना ज्याने वाचवलं तो देवमाणूस होता. पण ज्याने माझा व्हिडिओ काढला, त्याचा पत्ता मला द्या, त्याला मी सोडणार नाही'', असं म्हणत लोकल ट्रेनचा अपघात होताना बालबाल बचावलेल्या तरूणीने या अनोळखी व्यक्तीला दम भरला आहे. पूजा भोसले असं या तरूणीचं नाव असून ती भायखळा परिसरात राहणारी आहे.


व्हिडिओ व्हायरल

लोकल ट्रेनच्या दरवाजात उभं राहून प्रवास करताना एका तरूणीचा हात अचानक सुटला आणि ती दरवाजातून ट्रेनखाली घसरली. तिचं नशीब इतकं बलवत्तर की दुसऱ्याच क्षणाला इतर प्रवाशांनी तिचा हात पकडून तिला पुन्हा वर खेचलं आणि तिचा जीव वाचवला. ही घटना टिपणारा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.




काय म्हणाली पूजा?

या व्हिडिओत दिसणारी तरूणी म्हणजेच पूजा भोसले अखेर पुढे आली असून तिने झालेली हकीकत माध्यमांपुढे ठेवली. ''सोमवारी मी दिवा इथं राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी निघाले होते. विक्रोळी-भांडुप रेल्वे स्थानकांदरम्यान दरवाजात उभी राहून हेडफोन्सवर गाणी ऐकत असताना हाताला कळ लागल्याने हात झटकला आणि तोल जाऊन थेट खाली घसरले. यावेळी समोरून ट्रेन येत होती. पण बाजूला उभ्या असलेल्या प्रवाशाने माझा हात पकडत मला वर खेचलं म्हणून मी वाचले. मला वाचवणारा देवमाणूस होता. पण माझा व्हिडिओ काढणारा माणूसदेखील मला वाचवू शकत होता. पण त्याने तसं केलं नाही. उलट माझा व्हिडिओ व्हायरल केला. त्याला मी सोडणार नाही''

सध्या या प्रकरणाची आरपीएफ चौकशी करत असून या घटनेचा व्हिडिओ काढणाऱ्या प्रवाशाचा शोध घेतला जात आहे.



हेही वाचा-

स्टंटबाजी बेतली जीवावर, तरूणी ट्रेनखाली येताना थोडक्यात बचावली

व्हेल माशाची उलटी २० कोटींची, तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा