जोगेश्वरीत लव्ह, सेक्स और धोखा...

 Sham Nagar
जोगेश्वरीत लव्ह, सेक्स और धोखा...

जोगेश्वरी - जोगेश्वरीमध्ये 35 वर्षीय महिलेने एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जोगेश्वरी पूर्व येथे राहणा-या या महिलेचे अमित मोरे नामक व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये रहात होते. लग्नाचं आमिष दाखवून आधी आपल्यासोबत प्रेमसंबंध ठेवले आणि नंतर लग्नाला नकार दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे. सदर महिलेनं या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात अमित मोरेविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गु्न्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले. अमित मोरेला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading Comments