पालघर हत्याकांडातील मृत ड्रायव्हरच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च रविना उचलणार

१६ एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यात जमावाने तिघांची हत्या केली होती. यात दोन साधू आणि गाडीचा ड्रायव्हरचा समावेश आहे.

पालघर हत्याकांडातील मृत ड्रायव्हरच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च रविना उचलणार
SHARES

पालघर येथे जमावाच्या हल्ल्यात दोन साधू आणि ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या ड्रायव्हरच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च आता अभिनेत्री रविना टंडन उचलणार आहे.  ड्रायव्हरच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी माजी आमदार आणि भाजपचे मुंबई उपाध्यक्ष कृष्णा हेगडे प्रयत्न करत आहेत. यामध्ये रविना टंडन हिने मोठा मदतीचा हात पुढे केला आहे.

१६ एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यात जमावाने तिघांची हत्या केली होती. यात दोन साधू आणि गाडीचा ड्रायव्हरचा समावेश आहे. मृत ड्रायव्हर निलेश तेलगडे यांच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. निलेश हे घरातील एकमेव कमावते असल्याने त्यांच्या मृत्यूने तेलगडे कुटुंबावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी या कुटुंबाला मदत करण्यासाठी आर्थिक निधी उभारण्यास सुरुवात केली.


लॉकडाऊन असल्याने अॅपच्या माध्यमातून हा निधी गोळा केला जात आहे. हेगडे यांनी ४० लाख रुपये जमविण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. आतापर्यंत अडीच लाख रुपये जमा केले झाले आहेत. हेगडे यांच्या आवाहनानंतर रविना टंडनने निलेश यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. निलेश हा आमचा परिचित होता. तो केवळ साधूंची मदत करत होता. संतांच्या विनंतीवरूनच त्यांना तो सुरतला सोडायला गेला होता. मात्र त्यांची हत्या झाली, असं हेगडे यांनी सांगितलं. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, अशी मागणी हेगडे यांनी राज्यसरकारकडे केली आहे.


हेही वाचा -

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 498 वर

‘याच’ अटींवर सोडता येईल महाराष्ट्र, परप्रांतीयांसाठी दिशानिर्देश जारी





संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा