कार्यालयातील एसीचा वापर कमी करा, मुंबई पोलिस आयुक्त


कार्यालयातील एसीचा वापर कमी करा, मुंबई पोलिस आयुक्त
SHARES
 देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असुन, राज्यात या रोगाने बाधित झालेल्याचा आकडा 89 वर पोहचला आहे. अशातच नागरिकांच्या सदैव तत्परतेसाठी सज्ज असणाऱ्या पोलिसांना खबरदारीचा उपाय म्हणून एसीचा वापर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाने राज्यातील सर्व विभागांना याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानंतर हा आदेश देण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

देशात कोरोनाच्या संसर्गात महाराष्ट्र क्रमांक एकवर असुन, आत्तापर्यंत 89 जणाना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामुळे वेळीच खबरदारीचा उपाय म्हणुन राज्यात सरकारने144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. दळणवळणाच्या सुविधाही बंद ठेवण्यात आल्या असून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱया व्यक्तींनाच दळणवळणाच्या सुविधा वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. या संपूर्ण स्थितीत कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलिस कार्यरत आहेत. पण त्यांच्या आरोग्यही महत्त्वाचे असल्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात येत आहेत. त्या अंतर्गत कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एसीचा वापर कमी करण्यास पोलिस अधिकाऱयांना सांगण्यात आले आहे. याबाबत आरोग्य विभागाने 13 मार्चला परिपत्रक जारी केले होते. हे परिपत्रक पोलिस विभागालाही प्राप्त झाल्यानंतर सर्व अधिकाऱयांना एसीचा वापर कमी करण्यास सांगण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

 मात्रा कोरोनाचा संसर्ग बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना होऊ नये, यासाठी राज्य पोलिसानी कडक पाऊले उचलली आहेत. प्रत्योक पोलीस ठाणे अथवा पोलीस दलातील विविध शाखा तसेच विभागीया कार्यालयात अधिकारी-कर्मचायांची संख्या 100 टक्के न ठेवता ती केवळ 50 टक्के ठेवावी. तसेच पोलीस अधिकारी-कर्मचायांची दोन पथके प्रत्योक विभागात तयार करण्यात यावी. या पथकांना आलटुन-पालटुन म्हणजे आळीपाळीने कर्तव्यावर योण्यास सांगावे. एकाच वेळी सर्व अधिकारी-कर्मचायाना न बोलविता. एका पथकाला आज तर दुसाया पथकाला उद्या अशा पकारे ड्युटीचे वाटपकरण्यात यावे. जेणेकरुन तास ड्युटीनंतर संबधीत अधिकारी-कर्मचायाना चौवीस तास सुट्टी मिळेल. जेणेकरुन ते घरीच थांबतील. यामुळे कोरोनाच्या संसर्गापासुन या अधिकारी-कर्मचाऱ्यांना
काळजी घेता योईल, अशा उपाययोजनाही करण्यात येत आहेत. 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा