TRP scam : रिपब्लिकचे सीएफओ एस सुंदरम यांची उद्या होणार चौकशी

१० आँक्टोंबर रोजी रिपब्लिकने हंसाच्या एका रिपोर्टचा दाखला देत पोलिसांच्या आरोपाला आवाहन दिले होते. तसेच तो रिपोर्ट पोलिसांच्या तपासातला असल्याचा दावा केला होता.

TRP scam : रिपब्लिकचे सीएफओ एस सुंदरम यांची उद्या होणार चौकशी
SHARES

टिआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या चौकशीला समोर न जाणाऱ्या एस सुंदरम अखेर पोलिसांना शरण आले आहेत. उद्या ते मुंबई पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळते. मागील अनेक दिवसांपासून पोलिसांच्या चौकशीला सामोरे न जाण्यासाठी सुंदरम यांनी कधी सुप्रीमकोर्टात धाव घेतली. तर कधी घरातल्यांना कोरोना झाल्याचे कारण पुढे करत चौकशीला येणे टाळले.

हेही वाचाः- बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालं ‘हे’ निवडणूक चिन्ह

टिआरपी घोटाळ्यात  रिपब्लक चॅनेलच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ऐकीकडे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अर्णब गोस्वामीला कारवाई का करू नये म्हणून नोटीस धाडली असताना. १० आँक्टोंबर रोजी रिपब्लिकने  हंसाच्या एका रिपोर्टचा दाखला देत पोलिसांच्या आरोपाला आवाहन दिले होते. तसेच तो रिपोर्ट पोलिसांच्या तपासातला असल्याचा दावा केला होता. मात्र पोलिसांनी ते आरोप खोडून काढत चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी रिपब्लकचे अँकर नारायण स्वामी याला चौकशीला बोलावले होते. त्यानुसार बुधवारी नारायण स्वामी चौकशीला हजर राहिले होते.

हेही वाचाः- मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा

तर या प्रकरणील पाचवा आरोपी विनय त्रिपाटीला याला बुधवारी पोलिस मुंबईत घेऊन आले. रिपब्लिकने दाखल गेलेल्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याशिवाय अभिषेक कपूर याला देखील चौकशीला बोलावले आहे. या प्रकणात महाराष्ट्र राज्याकडून अँड राहुल चिटणीस आणि कपिल सिब्बल हे केस लढवणार आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा