TRP Scam: रिपब्लिक चॅनलचे पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

रिपब्लिकचे सीइओ विकास खानचंदानी, हर्ष भंडारी आणि डिस्ट्रिब्युटर हेड घनश्याम सिंग यांना चौकशीला बोलावले होते.

TRP Scam:  रिपब्लिक चॅनलचे पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
SHARES

मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळ्यात दिवसेंदिवस नव नवीन खुलासे समोर येत आहेत. यात प्रमुख्याने रिपब्लिक भारत चॅनलच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची रविवारी मुंबई पोलिसांनी चौकशी केली. यात प्रामुख्याने रिपब्लिकचे सीइओ विकास खानचंदानी, हर्ष भंडारी आणि डिस्ट्रिब्युटर हेड घनश्याम सिंग यांना चौकशीला बोलावले होते.  मात्र चौकशीत अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने त्यांना सोमवारी पून्हा चौकशीस हजर राहण्याच आदेश पोलिसांनी दिले आहेत.

हेही वाचाः- खोट्या अभिरुचीचा खोटा आधार : टीआरपी!

खोट्या टिआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी या पूर्वीच फक्त मराठी, बाँक्स मिडिया आणि रिपब्लिक भारत यांच्यावर गंभीर आरोप करत चौघांना आतापर्यंत अटक केली आहे. त्यात हंसाचे दोन कर्मचारी आणि फक्त मराठी आणि बाँक्स मिडिया या दोन चॅनेलच्या मालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यामधील आरोपी बोमापल्ली मिस्री याच्याकडे गेल्या एका वर्षापासून १ कोटींहून अधिक रक्कम चार-पाच जणांकडून त्याच्या बँक खात्यात जमा केल्याची गोष्ट उघडकीस आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मिस्री (४५) याला गेल्या दीड वर्षांपासून एकाच मार्गाने उत्पन्न येत नव्हते. तर मिस्री याच्या कुटुंबातील लोकांना तीन चॅनल्स पाहण्याचे पैसे दिले गेले होते. मिस्री याच्या बँक लॉकरमधून ८.५ लाख रुपये मिळाले असून त्याचे खाते फ्रिज करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या खात्यात २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः-बिहारच्या आखाड्यात महाराष्ट्र!

आरोपी विशाल भंडारी याच्या घरातून आज गुन्हे शाखेने एक डायरी हस्तगत केली आहे ज्यामध्ये बॅरोमिटर आणि चॅनेल्सची नाव आणि ट्राजेक्शनच्या नोंदी आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आलेल्या तीन चॅनेल्सपेक्षा जास्त चॅनल्सची नाव समोर आली आहेत. त्यानुसार लोकांना पैसे द्यायचे आहेत अशी नोंद आरोपी विशालने त्याच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवली आहेत. तर विशालने त्याच्या डायरीमध्ये १८०० घरांचे डिटेल्स ठेवले आहेत. ज्यामध्ये बॅरोमीटर्स बसवण्यात आले आहेत. तपासात इतर चॅनलेची नावे देखील समोर आल्याने रिपब्लिक, फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस चॅनेल्सच्या व्यतिरिक्त इतरही मोठ्या चॅनेलची नावे संशयाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा