टीआरपी घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अर्णब गोस्वामीने पून्हा घेतली कोर्टात धाव

या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांचा जाणीवपूर्वक छळ केला जात असल्याचा आरोप, अर्णब गोस्वामी यांनी विनंती अर्जात केला आहे.

टीआरपी घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवावा,  अर्णब गोस्वामीने पून्हा घेतली कोर्टात धाव
SHARES

मुंबई पोलिसांनी नुकतेच उघडकीस आणलेल्या बहुचर्चित टिआरपी घोटाळ्यात पोलिस चौकशीच्या नावाखाली रिप्बलिक चॅनेलच्या कर्मचाऱ्यांचा छळ करत असल्याचा आरोप अर्णबने केला आहे. त्यामुळे या संपूर्ण तपास आणि कायदेशीर कारवाईला न्यायालयाने स्थगिती द्यावी, अन्यथा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी अर्णबने त्याच्या विनंती अर्जात केली आहे.

हेही वाचाः-हसीना आपानंतर ‘झोपडपट्टी क्विन’ करीमा आपा तुरुंगात

चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी काही प्रमुख न्यूज चॅनेलने हंसा या रिसर्च ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना हाताशी बाळगून पैसे वाटून चॅनेल पाहण्यास सांगितले. यामुळे चॅनेलचा टीआरपी वाढला आणि जोरावर चॅनेलकडून जास्त दरात जाहीराती स्विकारल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एआरजी आऊटलायर कंपनीच्या रिपब्लिक टीव्हीचाही घोटाळ्यात सहभाग असल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मात्र, या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांचा जाणीवपूर्वक छळ केला जात असल्याचा आरोप, अर्णब गोस्वामी यांनी विनंती अर्जात केला आहे. एआरजी आऊटलायर ग्रुप आणि स्वतःच्या नावाने आधीच्या प्रलंबित याचिकेत अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचाः- बनावट नोटांची छपाई पाकच्या टाकसाळीत, चेंबूरमधून माजी नगरसेविकेच्या नवऱ्याला अटक

रिपब्लिक टीव्हीचे पश्चिम विभाग वितरण प्रमुख घनश्याम सिंग यांचा २६ दिवसांच्या कोठडीत प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला. सिंग यांना पट्ट्याने मारलं तसेच कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांना सातत्याने चौकशीसाठी बोलवून छळवणूक केली, असे गंभीर आरोप या अर्जात केले आहेत. तसंच,पोलिस आमच्याविरोधात चुकीच्या हेतूने ही चौकशी करत असल्याने ती स्थगिती करावी आणि तपास सीबीआयकडे सोपवावा', असंही या अर्जात नमूद केलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा