एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांचा राजीनामा अखेर मंजूर

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेले प्रदीप शर्मा १९८३ साली पोलिस दलात दाखल झाले होते. ९० च्या दशकात गुन्हेगारी टोळ्यांनी डोकं वर काढलं होतं. या गुन्हेगारांसाठी चकमकफेम प्रदीप शर्मा हे कर्दनकाळ ठरले.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांचा राजीनामा अखेर मंजूर
SHARES

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला होता. शर्मा हे येणाऱ्या विधानसभेत आपलं नशीब आजमवण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे त्यांनी खाकीचा राजीनामा दिला होता. तब्बल तीन महिन्यानंतर पोलिस महासंचालकांनी शर्मा यांचा राजीनामा स्विकारला आहे. शर्मा यांना शिवसेनेकडून नालासोपारा किंवा मुंबई येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

१०० एन्काऊंटर 

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेले प्रदीप शर्मा १९८३ साली पोलिस दलात दाखल झाले होते. ९० च्या दशकात गुन्हेगारी टोळ्यांनी डोकं वर काढलं होतं. या गुन्हेगारांसाठी  चकमकफेम प्रदीप शर्मा हे कर्दनकाळ ठरले. त्यानंतरच शर्मा हे प्रकाश झोतात आले. मात्र २००८ मध्ये  रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध या आरोपांमुळे २००८ मध्ये शर्मा यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यावेळी शर्मा यांच्यासह १३ जणांना अटकही करण्यात आली होती. मात्र २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शर्मा यांची आरोपातून मुक्तता केली. नऊ वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजेच २०१७ मध्ये ते पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले. प्रदीप शर्मा यांनी २५ वर्षांच्या सेवेत १०० पेक्षा जास्त गुन्हेगारांचं एन्काऊंटर केलं आहे.

४ जुलैला राजीनामा

तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातही शर्मा यांचं नाव पुढं आलं होतं. सगळ्या आरोपांतून मुक्त झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पोलीस दलात रुजू करून घ्यावं म्हणून प्रदीप शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती. काही महिने दुर्लक्ष केल्यानंतर गृहखात्याने त्यांना पोलीस सेवेत रुजू करून घेत त्यांची पोस्टींग ठाणे जिल्ह्यात केली. सेवेत रूजू होताच शर्मा यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करत, दाऊदच्या साम्राज्याला पहिला झटका दिला. मात्र ४ जुलै रोजी शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यानंतर शर्मा हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. परंतु दोन महिन्यांपासून त्यांचा राजीनामा गृहविभागाकडून स्विकारण्यात आला नव्हता. राजीनामा स्विकारावा यासाठी शर्मा यांनी गृहखात्याला पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर गृह विभागाचे उपसचिव व्यंकटेश भट यांनी सोमवारी शर्मा यांचा राजीनामा मंजूर केला.हेही वाचा -

गणपती उत्सवात चोरट्यांचा उच्छाद, चोरीची घटना सीसीटिव्हीत कैद

मुंबईत काश्मिरी गायकाला घर मालकाने हाकललं
संबंधित विषय