COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

मुंबईत काश्मिरी गायकाला घर मालकाने हाकललं

त्या एजंटने तुम काश्मीरी हो, तुम्हारा कोई भरोसा नही, असं सांगत त्याला रोखलं. त्यावेळी मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने दुसरीकडे जागा मिळेपर्यंत तरी राहण्याची आदीलने विनंती केली. मात्र त्याने त्याला घरात राहण्यास मज्जाव केला.

मुंबईत काश्मिरी गायकाला घर मालकाने हाकललं
SHARES
केंद्र सरकारने नुकतंच काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम हटवले. विशेष दर्जा संपून काश्मीरला इतर भागांशी सर्वच प्रकारे जोडण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र आजही काश्मिरी युवकांना आपलं मानलं जात नाही. याचीच प्रचिती प्रसिद्ध काश्मीरी गायक आदील गुरेजीला आली. मुंबईत भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या आदील गुरेजीला घरमालकाने ३७० कलम हटवल्यानंतर हाकलण्यात आलं. आपल्याला आलेला अनुभव आदीलने सोशल मीडियावर मांडल्यानंतर या प्रकरणाची दखल मुंबई पोलिस आयुक्तांनी घेत आदीलला पुन्हा घर मिळवून दिले.

मुंबईत दीड वर्षापासून

उत्तरी काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात आदील गुरेजी राहतो.  त्याने आतापर्यंत अनेक काश्मीरी गाणी गायली असून काश्मीरमध्ये तो प्रसिद्ध आहे. यू ट्युबसह इतर सोशल मीडियीवरही त्याचे लाखो चाहते आहेत. आदील हा सध्या अंधेरीच्या चार बंगला परिसरात भाड्याने दीड वर्षापासून राहतो.  आॅगस्ट महिन्यात काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असल्याने कुटुंबियांच्या काळजीपोटी आदील काश्मीरला त्याच्या घरी गेला होता. याच दरम्यान काश्मीरसाठीचे ३७० कलम हटवले. त्यामुळे काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असल्यामुळे पावलोपावली सैन्याचे जवान तैनात होते. त्यामुळे आदीलला मुंबईला परतता येत नव्हते. 

आयुक्तांकडून दखल

 काश्मिरमधील वातावरण पूर्वपदावर आल्यानंतर आदील ५ सप्टेंबर रोजी मुंबईत परतला. तो त्याने घेतलेल्या भाड्याच्या घरात जात असतानाच घर मालकाने नेमून दिलेल्या एजंटने त्याला घरात जाण्यापासून रोखत घर खाली करण्याचे आदेश दिले. याबाबत जाब विचारला असता, त्या एजंटने तुम काश्मीरी हो, तुम्हारा कोई भरोसा नही, असं सांगत त्याला रोखलं. त्यावेळी मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने दुसरीकडे जागा मिळेपर्यंत तरी राहण्याची आदीलने विनंती केली. मात्र त्याने त्याला घरात राहण्यास मज्जाव केला.
कुठलाच पर्याय नसल्याने अखेर आदीलने त्याचं हे दुख: सोशल मिडियावर व्यक्त केल्यानंतर सर्वच स्तरावरून टिकेची झोड उठू लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर याची दखल मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी घेतली. बर्वे यांनी आदीलला स्वत: फोन करून धीर देत, घटनास्थळी स्थानिक पोलिसांना आदीलच्या मदतीला पाठवलं. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर घर मालकाने निर्णय बदलत आदीलला पुन्हा घर भाड्याने राहण्यास दिलं.हेही वाचा  -

अंधश्रद्धेतूनच त्याने केली ३ वर्षाच्या मुलीची हत्या

डोंगरीत इमारतीचं छत कोसळून एकाचा मृत्यू
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा