डोंगरीत इमारतीचं छत कोसळून एकाचा मृत्यू

मागील तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे हे बांधकाम जीर्ण झाले होते.सोमवारी सकाळी या घराचे काम करण्यासाठी शब्बीर शेखसोबत मृत व्यक्ती त्या ठिकाणी आला होता.

डोंगरीत इमारतीचं छत कोसळून एकाचा मृत्यू
SHARES
मुंबईच्या डोंगरी परिसरात तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारत पडल्याच्या घटनेला महिना उलटत नाही तोच डोंगरीत एका अनधिकृत घराचं छत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचं नाव अद्याप समजले नसून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.

डोंगरीच्या चिंचबंदरमधील पहिल्या फ्लँक रोडवर साई माॅलजवळ या घराचं बांधकाम सुरू होतं. मागील तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे हे बांधकाम जीर्ण झालं होतं. सोमवारी सकाळी या घराचं काम करण्यासाठी शब्बीर शेखसोबत मृत व्यक्ती त्या ठिकाणी आला होता. काम सुरू असताना अचानक या दोघांवर घराचं छत कोसळलं. या दुर्घटनेत शेख हा जखमी झाला. मात्र त्याच्यासोबत असलेला कामगार दगावला. त्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचरण केलं. तर शब्बीरला जे.जे. रुग्णालयात नेलं. शब्बीर हा या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा -




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा