नायर रुग्णालयातील तरुण डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकललं

मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये १५ फेब्रुवारी रोजी एका २६ वर्षीय डाॅक्टरने आत्महत्या केली होती. या आत्महत्येमागचं कारण आता उघडकीस आलं आहे.

नायर रुग्णालयातील तरुण डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकललं
SHARES

मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये १५ फेब्रुवारी रोजी एका २६ वर्षीय डाॅक्टरने आत्महत्या केली होती. या आत्महत्येमागचं कारण आता उघडकीस आलं आहे. प्रेयसीचं लग्न ठरल्यामुळे या डाॅक्टरने आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. 

भिमसंदेश प्रल्हाद तुपे असं या आत्महत्या केलेल्या डाॅक्टरचं नाव आहे. १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या खोलीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांनी एवढं टोकाचे पाऊल का उचललं याबाबत पोलीस तपास करत होते. 

डॉ. तुपे आत्महत्येच्या आधी ३ दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये जाऊन आले होते. त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते औरंगाबादेत गेले होते. त्यानंतर ते मुंबईत आले. सोमवारी त्यांनी दिवसभर काम देखील केलं. संध्याकाळी त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये जाऊन इंजेक्शन घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर प्रेमप्रकरणातून त्यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. भिमसंदेश तुपे यांचं एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. पण प्रेयसीचं लग्न दुसऱ्याशी ठरल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.

तुपे यांचं ज्या तरुणीवर प्रेम होतं, ती नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे.दोघे एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. जिथे दोघांचे प्रेमसंबध जुळले.पुढील अभ्यासासाठी तुपे हे मुंबईत आले आणि महिला नागपूर मध्ये शिक्षण घेऊ लागली. डॉ. तुपे हे अॅनेस्थेशिया विभागात एमडीचे शिक्षण घेत होते.  त्यानंतर दोघे फोन आणि मॅसेज वर एकमेकांच्या संपर्कात होते. पण, अचानक प्रेयसीचे लग्न ठरले अशी बातमी त्यांच्या कानी पडली. त्यातून नैराश्य आल्यामुळे तुपे यांनी आत्महत्या केली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा