गुंगीचं औषध देऊन मालकिणीला १.३१ कोटींना ठगवलं

मालकाचा विश्वास संपादन करून संधी मिळताच तिजोरीची बनावट चावी बनवतो व आवश्यकता वाटल्यास ज्वेलर्स व त्याच्या घरच्या सदस्यांना गुंगीचे औषध देत ज्वेलर्स शॉप लुटून पोबारा करतो. अशी ही टोळी चोरी करण्यासाठी क्लुप्ती लढवायचे.

SHARE

बोरिवलीतील ज्वेलर्सचा मालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून नोकराने मालकिणीला गुंगीचे औषध देऊन तब्बल १. ३१ कोटी रुपयांची लूट केल्याची घटना एप्रिल २०१७ मध्ये घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला तब्बल अडीच वर्षानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मनिष देवीलाल दर्जी (३२) असं आरोपीचं नाव आहे. मनिषवर यापूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मूळचा राजस्थानचा असलेला मनिष आणि त्याचे साथीदार दरवर्षी परिसरातील एका ज्वेलर्स दुकानाची माहिती काढून त्यांच्या टोळीतील एकाला त्यांनी हेरलेल्या ज्वेलर्स शॉपमध्ये नोकरीला ठेवायचे. तो आरोपी मालकाचा विश्वास संपादन करून संधी मिळताच तिजोरीची बनावट चावी बनवून ज्वेलर्स व त्याच्या घरच्या सदस्यांना गुंगीचे औषध देत ज्वेलर्स शॉप लुटून पोबारा करायचे. त्यानंतर चोरीतील सोने वितळवून त्याची विक्री गुजरात येथे करून हवालामार्फत साथीदारांना पैसे पाठवायचे. त्यानुसार बोरिवली (प) येथील ज्वेलर्स मालकाकडे २०१७ मध्ये मनिष हा कामाला राहिला होता. कित्येक महिन्यापासून प्रामाणिक काम करणाऱ्या मनिषवर मालकाचा विश्वास होता. त्यामुळेच मालक दुकान बंद करण्यासाठी चाव्या मनिषकडे द्यायचा. मनिषने मालकाची नजर चुकवून त्या चाव्यांचा छाप साबणावर घेऊन बनावट चाव्या बनवल्या होत्या. १० एप्रिल २०१७ रोजी मालक काही कामानिमित्त मुंबई बाहेर गेले होती हीच संधी साधून मनिषने दुकानात असलेल्या मालकाच्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन दुकानातील १ कोटी ३१ लाखांचा ऐवज लुटून पळ काढला.

या प्रकरणाचा गुन्हा बोरिवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता. या प्रकरणातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र या गुन्ह्यातील सुत्रधार असलेला मनीष चोरीच्या ऐवजासह बेपत्ता झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असल्याने तो आपली ओळख बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट - १२ चे पोलीस करीत असताना त्यांना यातील मुख्य आरोपी मनीष हा मालाड पूर्व येथील डायमंड मार्केटजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मनीषने गुन्ह्याची कबुली दिली. मनिषने या पूर्वी दिंडोशी, नवघर, विलेपार्ले, व्ही. पी. रोड, धारावी परिसरात याच पद्धतीने चोरी केल्या असून त्याच्यावर गुन्हेही दाखल आहेत. हेही वाचा -

चर्नीरोड येथील रहिवाशी इमारतीला आग

दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई
संबंधित विषय
ताज्या बातम्या