चर्नीरोड येथील रहिवाशी इमारतीला आग

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ६ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

SHARE

मुंबईत एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली असून आठ जण इमारतीत अडकलेे आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


मुंबईतील चर्नीरोड परिसरातील ड्रीमलँड सिनेमाजवळ असलेल्या एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ६ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इमारतीमध्ये अनेक रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले. अजूनही बचावकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


आगीचे कारण समजू शकलेले नाही. तत्पूर्वी, आग लागलेल्या इमारतीत सात ते आठ जण अडकल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. या दुर्घटनेत सुदैवानं कुणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झालं नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या