खेरवाडीतून दरोडेखोराला अटक

ज्या परिसरातून अटक कऱण्यात आली आहे. तेथून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बंगला अवघ्या काही अंतरावर

खेरवाडीतून दरोडेखोराला अटक
SHARES

मुंबईच्या खेरवाडी जंक्शन येथून गुन्हे शाखा ९च्या पोलिसांनी एका दरोडेखोराला अटक केली आहे. इर्शाद खान उर्फ बाबू हुसेन खान असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या आरोपीकडून एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. आरोपी याठिकाणी काय करत होता, याची पोलीस कसून तपासणी करत आहेत. 

 हेही वाचाः- मुंबईतील 'या' रस्त्यावर ३ महिने पार्किंगबंदी

मुंबईच्या खेरवाडी परिसरात सराईत दरोडेखोर दरोडा, लूट टाकण्यासाठी येेणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांनी सापळा रचून इर्शाद खान उर्फ बाबू हुसेन खान याला अटक केली. त्याच्यावर गुजरात मध्ये खून, दरोडे, खंडणीसारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांना त्याच्या अंग झडतीत एक देशी कट्टा आणि सात काडतुसे हस्तगत केली आहे. 

 हेही वाचाः- मस्करीची झाली कुस्करी, घाटकोपरमध्ये तरुणाची हत्या

इर्शाद खान उर्फ बाबू हुसेन खान हा नेमकं कुठे दरोडा टाकण्यासाठी आला होता. याची माहिती पोलिस घेत आहे. विशेष म्हणजे इर्शाद खान उर्फ बाबू हुसेन खानला ज्या परिसरातून अटक कऱण्यात आली आहे. तेथून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बंगला अवघ्या काही अंतरावर आहे. त्याच्या चौकशीतून इतर गंभीर गुन्ह्यांची माहीती मिळू शकते असे पोलिसांकडून सांगण्यात येते. 

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा