सराईत गुन्हेगार अटकेत

 Mumbai
सराईत गुन्हेगार अटकेत

देवनार - देवनार पोलिसांनी सराईत गुन्हेगारांला रविवारी अटक केली. माजीद शेख असं या आरोपीचं नाव आहे. देवनार, चेंबूर, कुर्ला आणि ठाणे परिसरात अनेक जणांना माजीदनं लुटले होते. त्याच्यावर पोलीस ठाण्यात १५ ते २० गुन्हे दाखल आहेत. माजीद गोवंडी परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती देवनार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

Loading Comments