चेंबुरमधून लुटारु अटकेत

  Bainganwadi
  चेंबुरमधून लुटारु अटकेत
  मुंबई  -  

  बैंगनवाडी - रिक्षाचालकाला तलावारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना बुधवारी पहाटे शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. येथील शिवाजीनगर परिसरात राहणारा इलियास शेख हा रिक्षाचालक बैंगनवाडी परिसरात जात असताना त्याला दुचाकीवरून आलेल्या तीन इसमांनी अडवले. त्यानंतर तलवारीचा धाक दाखवत त्याच्याकडील रोख रक्कम देखील काढून घेतली. याच दरम्यान गस्त घालणाऱ्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ पाठलाग करत नबी शहा (28), अब्दुल खान (30) आणि शहजाद सय्यद (20) या तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तलवार देखील जप्त केली असून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.