ओव्हरहेड वायरचा शॉक लागून जखमी

 Chembur
ओव्हरहेड वायरचा शॉक लागून जखमी
ओव्हरहेड वायरचा शॉक लागून जखमी
See all

टिळकनगर- सोमवारी टिळक नगर स्टेशनवर अब्दुल फजलु रहमान अन्सारी ट्रेनच्या छतावरून प्रवास करत असताना ओव्हरहेड वायरला स्पर्श होऊन जखमी झाला. यात तो 65 टक्के भाजलाय. या युवकानं कुर्ल्याहून गोवंडीला आपल्या घरी जाण्यासाठी पनवेल लोकल पकडली. कुर्ल्याहून तो पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या छतावर चढला. ही लोकल टिळकनगर स्टेशनवर आली असताना त्याचा स्पर्श ओव्हर हेड वायराला झाला. पण सुदैवानं तो चिटकला नाही. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी आणि प्रवाशांनी त्याला खाली खेचले. उपचारासाठी त्याला सायन रुग्णालयात पाठवण्यात आलं. रेल्वे प्रशासन आणि प्रवासी संघटना जनजागृती वेळोवेळी करत असतात. पण स्टंटबाजी करणाऱ्यांवर मात्र याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाहीये.

Loading Comments