दलवीर सिंगच्या आत्महत्येचं गूढ कायम

 Mumbai Central
दलवीर सिंगच्या आत्महत्येचं गूढ कायम

मुंबई सेंट्रल - आरपीएफचे कॉन्स्टेबल दलवीर सिंग आत्महत्याप्रकरणी मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनुप कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. दलवीर सिंग याच्या आत्महत्येचं नेमक कारण काय याचा तपास सुरू असल्याचं शर्मा यांनी सागितले.

मुंबई सेंट्रल स्थानकात शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ड्युटीवर तैनात असताना दलवीर सिंग यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र दलवीर सिंगचं लग्न होणार होत. त्यासाठी त्याला सुट्टी मिळत नव्हती. त्यामुळेच संतापाच्या भरात त्यांनी टोकाच पाऊल उचलल्याचं बोलालं जात होतं. तर दलवीर सिंगला वेळोवेळी सुट्ट्या दिल्या गेल्यात. त्यामुळे हे चुकीचं बोललं जात असल्याचं या वेळी शर्मा यांनी सांगितलं.

Loading Comments