मुंबई सेंट्रल स्टेशनवर RPF जवानाची आत्महत्या

मुंबई सेंट्रल - मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरच आरपीएफ जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. स्वतःच्याच सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून 23 वर्षीय दलवीर सिंहने आत्महत्या केली. विशेष म्हणजे ज्यावेळी त्याने स्वत:ला गोळी मारली त्यावेळेस त्याचे 4-5 साथीदार त्याच्यासोबतच होते.

दलवीरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मूळ हरियाणाचा असलेला दलवीर सिंह 2015 पासून मुंबईत सेवेत रुजू झाला. शनिवारी त्याच्यासह पाच जवानांची ड्युटी गुजरात मेलमध्ये होती. मात्र, त्यापूर्वी मुंबई सेंट्रल स्थानकावरील कार्यालयातच त्याने गोळी झाडून आत्महत्या केली. दलवीरच्या आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. आरपीएफ आणि जीआरपी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Loading Comments