सतर्क राहा, सुरक्षित राहा !

बोरीवली - तुम्ही पाहत असलेले हे पोलीस, प्रत्येकाच्या हातात रायफल आणि त्यांच्यासोबत असलेले श्वान पथक... ही दृश्य हल्ली सर्वच रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळत आहेत. बोरीवली रेल्वे स्थानकावरही मॉकड्रिल घेण्यात आली. प्लॅटफॉर्मवरील कच-याचा डबा, बॅग, अगदी कानाकोपरा श्वान पथकासह पोलिसांनी पिंजून काढला. मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वेचीही पोलिसांनी झाडाझडती घेतली. गुजरातवरून आलेल्या एक्स्प्रेसमधल्या सामानाचीही तपासणी पोलिसांनी केली.

उरणमध्ये संशयित दहशतवादी दिसल्यानंतर संपूर्ण मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांसोबतच आरपीएफ पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त केलाय. त्याचवेळी नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

Loading Comments