आरपीएफनं घडवली आई मुलीची भेट

 Borivali
आरपीएफनं घडवली आई मुलीची भेट

बोरिवली - रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी एका हरवलेल्या मुलीची तिच्या आईशी भेट घडवून दिली आहे. ही मुलगी बोरिवली स्थानकाच्या फलाटवर फिरत असताना बघितल्यानंतर पोलिसांना संशय आला. त्यानंतर महिला सफाई कर्मचाऱ्याच्या मदतीनं मुलीला आरपीएफ कार्यालयात आणलं. पोलिसांच्या चौकशीनंतर मुलीनं दिलेल्या माहितीनुसार तिचं नाव सपना गुप्ता असं आहे. आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून ती घर सोडून निघाली होती. ती कांदिवली (पू) च्या हनुमाननगर, वडारपाडा इथली रहिवासी आहे. त्यानंतर पोलिसांनी संपर्क साधत तिच्या आईला कार्यालयात बोलावून मुलीला तिच्या आईकडे सुपूर्द केलं.

Loading Comments