आरपीएफ कर्मचाऱ्यांमुळे हरवलेली महिला सापडली

 Ghatkopar
आरपीएफ कर्मचाऱ्यांमुळे हरवलेली महिला सापडली

घाटकोपर - घाटकोपारच्या असल्फा विभागात राहणाऱ्या ममता लालदेव गोस्वामी ही 36 वर्षांची गतीमंद महिला गेल्या महिन्याभरापासून हरवली होती. पण विक्रोळी स्थानकात आपले कर्तव्य बजावणाऱ्या रेल्वेसुरक्षा बलाचे कर्मचारी योगेंद्र सिंग आणि उपनिरीक्षक ब्रिजेश कुमार यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ही महिला पुन्हा आपल्या घरी सुखरूप परतली. 26 ऑक्टोबरला ही महिला हरवली होती. तिचा भाऊ तेजबहादूर गोस्वामी आणि तिचे कुटुंब तिचा सगळीकडे शोध घेत होते. दरम्यान तिचा शोध घेत असताना रेल्वे सुरक्षाबलाच्या घाटकोपर कार्यालयात उपनिरीक्षक ब्रिजेश कुमार यांना ही महिला 11 नोव्हेंबरला सीसीटीव्ही दृश्यांमध्ये फिरताना दिसली. त्यावरून पोलिसांनी तिचा शोध घेत तिला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केलं.

Loading Comments