50 कोटींचं पेंटिंग चोरीला

 BDD Chawl
50 कोटींचं पेंटिंग चोरीला

वरळी - प्रख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांनी साकारलेलं पेंटिंग वरळीतल्या निर्लोन हाऊसमधून चोरीला गेलंय. या पेंटिंगची किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल. तब्बल 50 कोटी या पेंटिंगची किंमत आहे. वरळीतील निर्लोन हाऊसमध्ये शेअरहोल्डर असलेल्या मथुरदास यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केलीय. परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांचा तपास सुरूये. तसंच मथुरदास यांनी हे पेंटिंग अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या एका गॅलरीत असल्याचा दावा केलाय.

चित्रकार वाासुदेव गायतोंडे यांनी साकारलेलं हे पेंटिंग १९६०च्या दशकांतील आहे. गायतोंडेंचे हे पेंटिंग २००५ साली मुंबईतील ओशियन आर्टच्या लिलावांत ९० लाख रुपयांना विकले गेले होते. तर २०१३ साली हेच चित्र २० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. 

Loading Comments