राजकीय नेत्यांना धमकी देणारा गजाआड


SHARE

मुंबई - शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दीपककुमार गुप्ताच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दीपक कुमार गुप्ताने नीलम गोऱ्हे यांनाच नव्हे तर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण, भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांना देखील अश्याच स्वरूपाच्या धमक्या दिल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी आमदार अनिल गोटे यांना अश्याच स्वरूपाची धमकी दिल्याप्रकरणी दिपककुमारला अटक देखील झाली होती. विशेष म्हणजे हा दिपककुमार एक आरटीआय कार्यकर्ता असून जळगावमध्ये त्याचा मोठा दरारा आहे.

21 तारखेच्या रात्री शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या फोनवर अनोळखी नंबर वरुन फोन आला. फोन करणाऱ्याने अतिशय अश्लील भाषा वापरत नीलम ताईंना जिवे मारण्याची तसेच बलात्कार करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबईसह पुण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. अश्याच स्वरूपाची तक्रार आमदार विद्या चव्हाण यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हा दिपककुमार पोलिसांना सापडला. जळगाववरून त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल आणि सात सीम कार्ड्स जप्त केली आहेत. याच सीम कार्डच्या मदतीने दिपककुमार नेत्यांना धमक्या देत होता. बुधवारी दिपककुमारला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला चार तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या