माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या


माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या
SHARES

कलिना - सांताक्रुझच्या कलिना भागातील रज्जाक चाळीत राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते भुपेंद्र हिरजी यांची राहत्या घरात गोळी झाडून हत्या करण्यात आलीय. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. शनिवारी अज्ञातांनी घरी घुसून भुपेंद्र यांच्यावर गोळी झाडली आणि तिथून पळ काढला. त्यांना उपचारासाठी व्हि.एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कलिना परिसरातील अवैध व्यवसाय आणि बांधकामांची पोलखोल त्यांनी केली होती. तसेच याविरोधात पोलीस आणि पालिकेकडे वारंवार तक्रारीही केल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसचे माजी नगरसेवक रज्जाक खान आणि एका भू- माफियाला पालिकेनं नोटीस पाठवण्यास सुरुवात केली होती. भुपेंद्र यांना अनेकदा धमक्याही देण्यात आल्या होत्या. हत्येमागे काँग्रेस नगरसेवक रज्जाक खान आहेत, असा आरोप भुपेंद्र यांच्या कुटुंबियांनी केलाय. तसंच चार वर्षांपूर्वी रज्जाक खान यांनी भुपेंद्र यांच्या मुलाला मारहाण केल्याचंही बोललं जातंय.

भुपेंद्र हे आम आदमी पक्षाचे सदस्य होते. त्यामुळे आम आदमी हत्येचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी केलीय. यासंदर्भातील एक निवेदनही मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आपनं दिलीय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा