गुंडांची मारहाण सीसीटीव्हीत कैद

 Andheri
गुंडांची मारहाण सीसीटीव्हीत कैद

चकाला - गुंडांना पोलिसी यंत्रणेचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आणि या प्रश्नातलं तथ्य समोर आणणारा प्रकार अंधेरीतल्या चकालात समोर आलं आहेे. आदेश्वर आर्केड या इमारतीच्या शॉप नं. आठमध्ये कोबरा इलाइट या कार्यालयात काही गुंड शिरले. ते तिथर्यंतच थांबले नाही तर त्यांनी मालकासह तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. 22 फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओही सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या गुंडांनी मारहाण का केली याबद्दल काहीच माहीत नसल्याचं कार्यालयाचे मालक आदित्य श्रीवास्तव यांनी सांगितलं. याप्रकरणी तिघांना अटक केली असून एक आरोपी अजूनही फरार आहे.

Loading Comments