सचिन वाझे यांना १० दिवसांची पोलीस कोठडी

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्या मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

सचिन वाझे यांना १० दिवसांची पोलीस कोठडी
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारममध्ये ठेवलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यप्रकरणी अटक केलेल्या सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी सचिन वाझे यांना एनआयएने १३ तास चौकशी केल्यानंतर अटक केली होती. 

रविवारी वाझे यांनी एनआयएच्या विशेष न्या्यालयासमोर हजर करण्यात आलं. एनआयएने  वाझे यांना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात याप्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्या मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सचिन वाझे यांनी एनआयए अधिकाऱ्यांना या इनोव्हा कारबद्दल माहिती दिली. त्यानंतर एनआयएने ही कार ताब्यात घेऊन कार्यालयात आणली.

एनआयएने ताब्यात घेतलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार शनिवारी रात्री मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात उभी होती. तेथूनच ही कार ताब्यात घेण्यात आली.या कारने स्फोटके भरलेल्या स्कॉर्पिओचा पाठलाग केला होता. ही कार गेल्या अनेक दिवसांपासून तेथे उभी होती अशी माहिती उघड झाली आहे.  कारच्या मागे मुंबई पोलीस असं लिहिलेलं होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा