सचिन वाझे यांना साईड पोस्टिंग, नागरी सुविधा केंद्रात बदली

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरुन हटवल्याची घोषणा केली होती.

सचिन वाझे यांना साईड पोस्टिंग, नागरी सुविधा केंद्रात बदली
SHARES

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर-cfc) विभागात बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघालं. शुक्रवारी ते पदभार स्विकारण्याची शक्यता आहे. 

मनसुख हिरेन यांच्या पत्नीने वाझेंवर खुनाचा आरोप केला आहे. अधिवेशनात विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला घेरलं. वाझे यांना निलंबीत करून अटक करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरुन हटवल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून सचिन वाझे यांची बदली आता कोणत्या विभागात होणार याकडं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथकाने दहा तास चौकशी केली आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली.

दरम्यान, सचिन वाझे यांनी त्यांच्या गाडीचा एक गाडी पाठलाग करत असून त्याचा नंबर बनावट आहे, असा दावा केला आहे. गाडीमध्ये पोलिसांचा बोर्ड लावून गाडीचा पाठलाग होत असल्याचं वाझे यांनी म्हटलं आहे. वाझे यांचा पाठलाग करणारी गाडी एटीएसची असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा