म्हाडाच्या बोगस एजंटला अटक

  Sakinaka
  म्हाडाच्या बोगस एजंटला अटक
  मुंबई  -  

  स्वस्तात म्हाडाची घरे देण्याची स्वप्न दाखवून कित्येक सामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका दलालला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. कतुुबुद्दीन जोहरी (37) असे या दलालाचे नाव असून त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून 25 ग्रहकांना 4 कोटींहून अधिक रकमेला फसवल्याचा दावा साकीनाका पोलिसांनी केला आहे.

  काही महिन्यांपूर्वी एका अपंग महिलेला या कुतुबुद्दीनने म्हाडात घर मिळवून देतो असे सांगून तब्बल 50 लाख रुपयांना फसवल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला होता.

  पीडित महिलेला म्हाडाच्या स्किममध्ये घर घ्यायचे होते. पण अपंग असल्याचा दाखला नसल्याने ते शक्य होत नव्हते. त्यात तिची ओळख या कुतुुबुद्दीन जोहरीशी झाली. त्याने तिला 5 हजार रुपयात अपंग असल्याचा दाखला मिळवून देण्याची हमी दिली. एवढ्यावरच तो थंबला नाही तर आपल्या मित्रांची थेट मंत्रालय तसेच आमदार आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचा दावा केला. या ओळखीने घर मिळवून देण्याच्या नावाखाली कुतुबुद्दीन आणि त्याच्या साथीदारांनी सुरुवातीला 5 लाख नंतर 10 लाख असे जवळजवळ 50 लाख या अपंग महिलेकड़ून उकळले. एवढे पैसे देऊन देखील आपल्याला घर न मिळाल्याने आपण फसवले गेल्याचे या महिलेच्या लक्षात येताच तिने पोलिसांत याची तक्रार नोंदवली.

  या टोळीचा म्होरक्या असलेल्या कुतुुबुद्दीनला जरी पोलिसांनी अटक केली असली तरी जेव्हा पोलीस या कुतुुबुद्दीन आणि त्याच्या साथीदारांकड़ून पैसे वसूल करतील तेव्हा खऱ्या अर्थाने फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळेल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.