सलमान खानला अटक

 Dahisar
सलमान खानला अटक

कलिना - कलिना परिसरात एका फ्लॅटमध्ये चोरी करणाऱ्या 22 वर्षीय सलामान खान या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सलमान त्याच्या दोन मित्रांसोबत कलिनातील एका फ्लॅटमध्ये घुसला आणि त्याने चक्क 20 मिनीटात 3 लाख 60 हजारांच्या सामानाची चोरी केली. विशेष म्हणजे हा सलमान खान आणि त्याचे दोन मित्र चोरी करण्यासाठी बॉलिबूड सुपर स्टारच्या नावाचा वापर करतात. यातील दोन आरोपी शाहरूख आणि सैफ फरार असून, सलमानला पकडण्यात पोलिसांना यश आलं. दरम्यान 1 सष्टेंबरला सुंदरनगरच्या के स्प्रिंगफिल्ड अपार्टमेमध्ये एका फ्लॅटमध्येही चोरी झाल्याची घटना घडली होती.

Loading Comments