होय, मी बेटिंग केलं - अरबाझ खानची कबुली


SHARE

बाॅलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाझ खान याचा पाय अाता खोलात सापडण्याची शक्यता अाहे. कारण अापण अायपीएलमध्ये बेटिंग केल्याची कबुली खुद्द अरबाझ खान याने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकासमोर दिली अाहे. अायपीएल सट्टेबाजीदरम्यान अरबाझ खान यानं ३ कोटी रुपये गमावले असल्याचंही कबूल केलं अाहे.  बाॅलिवूड दिग्दर्शक पराग संघवी याचंही नाव या सट्टेबाजीप्रकरणात पुढे अालं अाहे. 


बुकी सोनू जलानशी जुने संबंध

अांतरराष्ट्रीय कुख्यात बुकी सोनू जलान याच्याशी अापले जुने संबंध अाहेत. गेल्या सहा वर्षांपासून 'मी सोनूला अोळखत असून सट्टेबाजीप्रकरणी अापलं नाव पोलिसांना सांगू नये, यासाठी सोनू मला पैशांची मागणी करून धमकावत होता', अशी जबानी अरबाझ खान यांनी पोलिसांसमोर दिल्याचं समजतं.


अरबाझ ठाणे पोलिसांसमोर सादर

अायपीएल सट्टेबाजीप्रकरणी शुक्रवारी ठाणे खंडणी विरोधी पथकानं अभिनेता अरबाझ खानला समन्स बजावलं होतं. त्यानंतर शनिवारी सकाळी ११.०७ वाजता अरबाझ खान क्राइम ब्रँच कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा अाणि अन्य दोन पोलीस अधिकारी सध्या अरबाझ खानची चौकशी करत अाहेत. मात्र अायपीएलच्या ११व्या मोसमात अापण सट्टेबाजी केल्याचं अरबाझ खाननं कबूल केलं अाहे.


हेही वाचा -

अायपीएल सट्टेबाजीप्रकरणी अभिनेता अरबाझ खानला समन्स

संबंधित विषय
ताज्या बातम्या