आर्यन खानला क्लिनचीट दिल्यानंतर समीर वानखेडे म्हणाले...

आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आल्यानंतर सीएनएनने समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

आर्यन खानला क्लिनचीट दिल्यानंतर समीर वानखेडे म्हणाले...
SHARES

एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीनचीट दिली आहे. कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकत कारवाई केलेल्या मुंबई एनसीबीचे (NCB) तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे.

आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आल्यानंतर सीएनएनने समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर समीर वानखेडे यांनी म्हटलं, "मी या प्रकरणाशी आता संबंधित नाहीये आणि यावर भाष्य करू इच्छित नाही".

आर्यन खानकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. आर्यन खानसह एकूण 6 जणांना एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.

पुराव्यांअभावी साह जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे तर इतर 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीने विशेष न्यायालयात आपले अंतिम आरोपपत्र दाखल केले आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुद्दतवाढ दिलेली. हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ 29 मे रोजी संपुष्टात येणार होती आणि त्यापूर्वी एनसीबीने आता आरोपपत्र दाखल केले आहे.

2 ऑक्टोबरच्या रात्री आर्यन खानला एनसीबीच्या टीमने मुंबईतील क्रूझ शिपच्या टर्मिनलमधून पकडले होते. आर्यन खानसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चंटलाही एनसीबीने पकडले. ड्रग्ज प्रकरणात एकूण 8 जणांना अटक करण्यात आली. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर ड्रग पार्टी होणार असल्याचा आरोप एनसीबीने केला होता. आर्यन खान या पार्टीचा भाग होणार होता.

अरबाजच्या शूजमधून ड्रग्ज पकडण्यात आले, तरीही एनसीबीला आर्यनजवळ ड्रग्स सापडले नाहीत. आर्यन काही दिवस एनसीबीच्या कोठडीत होता, त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

आर्यनचा जामीन अर्ज दोनदा फेटाळण्यात आला. त्याला मुंबईतील आर्थर रोल जेलमध्ये ठेवण्यात आले आणि त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी आर्यनला जामीन मिळाला. मुंबईतील आर्थर रोल जेलमध्ये जवळपास २८ दिवस घालवल्यानंतर आर्यन खानची सुटका करण्यात आली होती.



हेही वाचा

क्रुझ ड्रग्स प्रकरण : शाहरुख खानचा मुलगा आर्यनला क्लिनचीट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा