'पोलिसांची बनवेगिरी' सनातनचा आरोप

  Pali Hill
  'पोलिसांची बनवेगिरी' सनातनचा आरोप
  मुंबई  -  

  पोलिसांना तपासापेक्षा सनातनची बदनामी करण्यातच अधिक रस दिसत आहे. सनातनच्या आश्रमात  सापडलेली औषधे ही नार्कोटिक नाहीत. तरीही ती औषधे नार्कोटिक असल्याचा कांगावा पोलीस करत आहेत. असे वक्तव्य सनातनचे संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे निमंत्रक अॅड. संजीव पुनाळेकरही उपस्थित होते.पानसरे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी कोल्हापूरच्या विशेष तपास पथकाने सनातच्या पनवेलच्या देवद या  आश्रमावर धाड टाकली होती. ड्रग्ज अॅण्ड कॉस्मेटिक अॅक्ट 1940  नुसार मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना औषधांचा साठा आणि वितरण यांकरीता लागणाऱ्या परवान्यात पूर्णत: सवलत देण्यात आलेली आहे. असे असतांनाही औषधांचा साठा जप्त करण्यात आला. इतकेच नव्हे तर ही औषधे जप्त केल्याचा पंचनामा पोलिसांनी प्रसिध्दीमाध्यमांना बेकायदेशीरपणे दिला,असे संस्थेचे निमंत्रक अॅड. संजीव पुनाळेकर यांनी यावेळी सांगितले.

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.