सहायक पोलीस निरिक्षक संजय माळी निलंबित

 Santacruz
सहायक पोलीस निरिक्षक संजय माळी निलंबित

सांताक्रूझ - जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देण्याचं आमीष दाखवून फसवणूक करणारे सहायक पोलीस निरिक्षक संजय माळी यांना निलंबित करण्यात आलंय. याप्रकरणात आधीच पोलिसांनी संजय माळीच्या मित्रांना अटक केली होती. संजय माळी हे सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये सहायक पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत होते. बिल्डर संजय नाईकला काळा पैसा सफेद करतो सांगून 3 करोड माळीनं घेतले. पण ते पैसे घेऊन माळीनं पळ काधला, असा आरोप संजय नाईकनं केला. त्यानंतर नाईकनं पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. 

Loading Comments