SHARE

सांताक्रूझ - अंमली पदार्थाँची तस्करी करणाऱ्या दोन महिलांना सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे.

सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे हवालदार संतोष पाटील यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जुहू येथील रॉयल लेन या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. या दोघींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत. या दोघींची साथीदार असलेली एक महिला फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या