हा मुलगा नव्हे सैतानच...

अंधेरी - जन्मदात्या आईलाच अमानुषपणे मारहाण करणारा हा नराधम...त्या आईला होणाऱ्या वेदना, काळीज पिळवटून टाकणारा तिचा आवाज...ही दृष्य आहेत अंधेरीतल्या डी. एन. नगर परिसरातली...ही दृष्य पाहून तुम्हाला संतापही येईल. एका मुलानेच स्वत:च्या 80 वर्षाच्या जन्मदात्या आईचा अमानुष छळ केला. या नराधमाचे नाव आहे सुरेंद्र वैद्य. या नराधमाने तिला अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने क्रुरतेचा कळसच गाठला. त्याने त्याच्या आईला पंख्याला उलटे टांगले. तिच्या वेदना या उलट्या काळजाच्या नालायकापर्यंत जणूकाही पोहोचतच नाही. या सैतानाने असे करून आई - मुलाच्या नात्याला काळिमा फासला आहे. या क्रुरकर्मात या नराधमाची बायको आणि बहीणही सहभागी आहे. हा नराधम मारत असतानाचा व्हिडिओ त्याची पत्नी आणि बहीण चित्रीत तर करतच होत्या. पण मजाही घेत होत्या. आईच्या मायेची कदर तर सोडाच पण एक स्त्री म्हणून त्याची बायको आणि बहीण हे पाप करण्यासाठी धजावल्याच कशा? असा प्रश्न पडतोय.

हा अमानुष अत्याचार सुदैवाने एका सामाजिक संस्थेला कळताच त्यांनी पोलिसात तक्रार केली. डी. एन. नगर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. जन्मदात्या आईचाच इतका अमानुष छळ करण्यापर्यंत या मुलाची मजल गेलीच कशी हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

Loading Comments