विदेशी बाटलीतून भारतीय बनावटीच्या दारूची विक्री


विदेशी बाटलीतून भारतीय बनावटीच्या दारूची विक्री
SHARES

चारकोप - अबकारी कर विभागाने चारकोपध्ये 12 नोव्हेंबरला छापा घालून अवैधरित्या बनवली जाणारी दारू जप्त केलीय. मुंबईत होणाऱ्या हायप्रोफाइल लग्न, इव्हेंट आणि पार्टीमध्ये परदेशी ब्रँड्सच्या बाटलीत भारतीय बनावटीची दारू भरून जास्त दरानं विकली जात होती. तपास अधिकारी वैभव वैद्य यांनी सांगितलं की, चारकोपच्या सेक्टर क्रमांक 8 मधील साई सिद्धी या इमारतीत काही जण भारतीय बनावटीची दारूला परदेशी असल्याचं सांगून जास्त भावात विक्री करत काळा धंदा करत होते. यासंदर्भातली माहिती मिळताच अबकारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या घरावर छापा टाकत चार लाख 24 हजारांची दारू आणि परदेशी ब्रँड्सचे स्टीकरही जप्त केलेत. सध्या या गोरख धंद्यातील मुख्य आरोपीचा तपास सुरू आहे.   

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा