स्कूलबसमध्ये गिअरऐवजी लाकडी बांबूचा वापर

स्कूल बसमध्ये गिअरऐवजी लाकडी बांबूचा वापर करणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं. तुमची मुलं देखील स्कूल बस किंवा व्हॅननं शाळेत जातात? मग पालकांनो तुम्हाला आणखीन सतर्क राहायची गरज आहे.

स्कूलबसमध्ये गिअरऐवजी लाकडी बांबूचा वापर
SHARES

सांताक्रूझ परिसरातील नावाजलेल्या पोदार शाळेच्या स्कूलबसमध्ये गिअरऐवजी लाकडी बांबूचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे स्कूल बस आणि व्हॅननं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर खार पोलिसांनी या बसचालकाला अटक केली आहे. गेल्या तीन दिवसंपासून हा प्रकार सुरु असल्याची आणखी एक धक्कादायक बाब पोलीस चौकशीतून समोर आली आहे.


नेमक प्रकरण काय?

सांताक्रूझ इथल्या पोदार इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बसवर राजकुमार चालक म्हणून काम करायचा. मंगळवारी राजकुमारच्या बसनं खारमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या कारला धडक दिली. त्यावेळी व्यावसायिकानं बसचा पाठलाग करून बस थांबवली. त्यावेळी बसच्या गिअरऐवजी बांबू वापरला जात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर कार चालकनं तात्काळ खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कार चालकाच्या तक्रारीवरून खार पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना तपासणी दरम्यान लाकडी बांबूनं गिअर टाकला जात असल्याचं आढळलं. त्यानंतर राजकुमार याची चौकशी केल्यानंतर त्याच्या गिअर बॉक्समध्ये तीन दिवसांपूर्वी बिघाड झाला असल्याचं समोर आलं. मात्र दुरुस्तीसाठी वेळ मिळत नसल्यानं बांबूचा वापर केल्याचं राज कुमारनं पोलिसांना सांगितलं. यानंतर त्याच्यावर कलम 279 (बेदरकारपणे वाहन चालवणे) आणि कलम 336 (जीव धोक्यात घालणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हेही वाचा

रस्ते वाहतुकीसाठी एकच हेल्पलाईन नंबर

ओला-उबर सेवा बेकायदेशीर, चालक संपावर जाण्याची शक्यता



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा