Advertisement

रस्ते वाहतुकीसाठी एकच हेल्पलाईन नंबर

एखादा अपघात झाल्यास प्रवाशांना अपघातस्थळांची आणि आपत्कालीन स्थितीत योग्य आणि अधिकृत माहिती मिळावी यासाठी, राज्यात रस्ते वाहतुकीसाठी लवकरच सर्व समावेशक एकाच क्रमाकांची हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं, या हेल्पलाइनची निर्मिती राज्याच्या आयटी विभागाकडून करण्यात येणार आहे.

रस्ते वाहतुकीसाठी एकच हेल्पलाईन नंबर
SHARES

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, एस.टी.महामंडळ यांचे वेगवेगळे हेल्पलाइन नंबर आहेत. हेल्पलाईन वेगवेगळ्या असल्यामुळे एखादी घटना घडल्यास प्रवाशांनी हेस्पलाईनवर संपर्क साधल्यास संपर्क होत नाही. तसंच यातील काही हेल्पलाईन बंद आहेत. त्यामुळं एखादा अपघात झाल्यास प्रवाशांना अपघातस्थळांची आणि आपत्कालीन स्थितीत योग्य आणि अधिकृत माहिती मिळावी यासाठी, राज्यात रस्ते वाहतुकीसाठी लवकरच सर्व समावेशक एकाच क्रमाकांची हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं, या हेल्पलाइनची निर्मिती राज्याच्या आयटी विभागाकडून करण्यात येणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाची १८००-२२०-११० या क्रमांकाची हेल्पलाइन आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) १८००-२२-१२५० या क्रमांकाची हेल्पलाइन आहे. मुंबई-पुणे महामार्गासाठी ९८२२४-९८२२४ या क्रमांकाची हेल्पलाईन आहे. तसंच, मुंबई-नाशिक महामार्गासाठी ०२५५३-२२०००१ या क्रमाकांची हेल्पलाइन आहे.


एकच हेल्पलाईन

एखादी घटना घडल्यास या हेल्पलाईनवर संपर्क होत नाही. तसंच काही वेळा या हेल्पलाईन व्यस्त असतात तर, कधी बंद असतात. त्यामुळं प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी, रस्ते वाहतुकीसाठी सर्व समावेशक एकाच क्रमाकांची हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे.


हेही वाचा -

राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर 

१० नव्हे १५ महिन्यात उभारणार लोअर परळचा पुल!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा