Advertisement

राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर

विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाने आतापर्यंत तब्बल १६ वेळा राष्ट्रीय युवा महोत्सवात अजिंक्यपद राखण्याचा बहुमान मिळवला आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर
SHARES

३४ व्या आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने तब्बल ६९ गुणांची कमाई करत अंतिम विजेतेपद पटकावले आहे. यात ६ सुवर्ण तर ३ रौप्य पदकांचा समावेश असून सर्वसाधारण विजेतेपद पटकावून या स्पर्धेवर मुंबई विद्यापीठन विजयी मोहोर उमटवली आहे. नुकतंच १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान असोशिएसन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या माध्यमातून चंदीगड विद्यापीठात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाने आतापर्यंत तब्बल १६ वेळा राष्ट्रीय युवा महोत्सवात अजिंक्यपद राखण्याचा बहुमान मिळवला आहे. 


अशी असते स्पर्धा 

असोशिएसन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या माध्यमातून दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत संगीत, नृत्य, ललीत कला, अभिनय, साहित्य यासरख्या प्रत्येक विभागातील गटामध्ये एकूण २७ स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. व या स्पर्धेतील गुणानुसार एकूण ३ विद्यापीठे अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. यंदा ही स्पर्धा चंदीगड विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली होती. यासाठी देशातील एकूण १०६ विद्यापीठे राष्ट्रीय स्तराच्या फेरीसाठी पात्र ठरली होती.


मुंबई विद्यापीठाची ६९ गुणांची कमाई

यानुसार मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लोकवाद्य संगीत, नाटूकलं, पाश्चात्य गायन, पाश्चात्य वादन, शास्त्रीय नृत्य आणि कोलाज यासारख्या विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतला. या सहा  स्पर्धांमध्ये विद्यपीठने सुवर्ण पदक प्राप्त केले असून भारतीय समुह गीत, पाश्चात्य समुह गीत आणि मुकनाट्य या तीन स्पर्धांमध्ये रौप्य पदकांची कमाई केली आहे. यानुसार विद्यापीठाने एकूण ६९ गुणांची कमाई करत अजिंक्यपद मिळवले आहे.

“कला-सांस्कृतिक क्षेत्रात मुंबई विद्यापीठाने केलेल्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आज देशपातळीवर मुंबई विद्यापीठाचा नावलौकीक होतो आहे, याचा विशेष आनंद होत आहे. विद्यापीठाची कला क्षेत्रातील उज्वल परंपरा या विद्यार्थ्यांनी पुढे नेलेली आहे. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा”.

प्रोफेसर सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ


मुंबई विद्यापीठ अव्वल

दरम्यान मुंबई विद्यापीठ आणि बनस्थाली विद्यापीठ यांचे गुण समान असल्याने प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला आहे. तसेच पश्चिम विभागातून मुंबई विद्यापीठाचे एकूण १३ स्पर्धांप्रकार राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. त्यातील ९ स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाने पदके मिळवून यश संपादन केले आहे तर थिएटर विभागासाठी सर्वसाधारण चषक मिळवले आहे.


हेही वाचा -

परळच्या शिरोडकर शाळेला सीबीएसई बोर्डाची मान्यता

शिक्षणासाठी यंदा २ हजार ७३३ कोटींची तरतूद



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा