Advertisement

परळच्या शिरोडकर शाळेला सीबीएसई बोर्डाची मान्यता

परळच्या शिरोडकर शाळेला सीबीएसईची मान्यता मिळत नसल्यानं दहावीच्या ८४ विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण अखेर यावर तोडगा निघाला.

परळच्या शिरोडकर शाळेला सीबीएसई बोर्डाची मान्यता
SHARES

मुंबईतल्या डॉ. शिरोडकर शाळेला अखेर केंद्रीय शिक्षण मंडळाची (सीबीएसई) मान्यता मिळाली आहे. सीबीएसईची मान्यता मिळाल्यानं दहावीचे विद्यार्थी परीक्षेचा अर्ज भरू शकणार आहेत. त्यामुळे शाळेतल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे

२१ फेब्रुवारीपासून सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा सुरू होत आहे. शिरोडकर शाळेत जवळपास दहावीचे ८४ विद्यार्थ्यी शिकत आहेत. मात्र शाळेला मान्यता मिळत नसल्यानं या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालक वर्गातही चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.

खरंतर शाळेनं तीन वर्षापूर्वीच सीबीएसईसाठी मान्यता प्रक्रिया सुरू केली होती. पण काही अडचणी येत असल्यानं शाळेला सीबीएसईची मान्यता मिळत नव्हती. यावर तोडगा काढण्यासाठी पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे धाव घेतली होती. विनोद तावडे यांनी यावर तोडगा काढण्याचं आश्वासनही दिलं होतं. अखेर तीन वर्षांच्या खटाटोपानंतर शिरोडकर शाळेला सीबीएसई मान्यता मिळाली आहे.


हेही वाचा

दहावीचं हॉल तिकीट आता ऑनलाइन

विद्यार्थिनींच्या खात्यात ५ हजार होणार जमा, पालिका अर्थसंकल्पात तरतूद


संबंधित विषय