Advertisement

१० नव्हे १५ महिन्यात उभारणार लोअर परळचा पुल!

लोअर परळ पूर्व-पश्चिमेला जोडणारा जीर्ण अवस्थेतील पुल पाडण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचं काम पूर्ण आहे. आता नव्या पुलाच्या उभारणीसाठी १५ महिन्यांचा कलावधी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

१० नव्हे १५ महिन्यात उभारणार लोअर परळचा पुल!
SHARES

लोअर परळ पूर्व-पश्चिमेला जोडणारा जीर्ण अवस्थेतील पुल पाडण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचं काम पूर्ण आहे. आता नव्या पुलाच्या उभारणीसाठी १५ महिन्यांचा कलावधी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


पुलाचं तोडकाम यशस्वीरीत्या पुर्ण

लोअर परळ पुलाचा रेल्वे लाईनवर असलेलं बांधकाम शनिवार व रविवारी यशस्वीरीत्या तोडण्यात आलं. पुलाच्या तोडकामासाठी पश्चिम रेल्वेतर्फे शनिवारी ते रविवारी एकूण ११ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, या पुलाचे तोडकाम ९० मिनीटे अगोदर पूर्ण झाले असून रविवारी सकाळी ७.४० वाजता लोअर परेल स्थानकातून अवंतिका एक्सप्रेस रवाना झाली. दरम्यान या पुलाच्या तोडकामानंतर नवीन पुल बांधण्यासाठी १० महिन्यांऐवजी १५ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने निश्चितच नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.


९८ वर्षे जुना धोकादायक पुल

९८ वर्षे जुना धोकादायक लोअर परेल पूलाच्या तोडकामानंतर या ठिकाणी नव्या ८५ मीटर बाय २७.५ मीटर इतका स्टेलनेस स्टीलचं बांधकाम करण्यात येणार आहे. तसंच, नव्या पुलाच्या बांधकामासाठी ८४ कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. सध्या लोअर परेलच्या पुलाखाली ५ रेल्वे मार्गिका आहेत. मात्र, एमयूटीपी टप्पा २ मध्ये मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिका प्रस्तावित आहे. त्यामुळे लोअर परळ पुलाखालील सहाव्या मार्गिकेचा विचार करून पूलाचं बांधकाम करण्यात येणार आहे.


वाहतूकीवर परिणाम

लोअर परेलचा पुल बंद असल्याचा परिणाम वाहतूकीवर होत आहे. या परिसरात मोठमोठी कॅार्पेोरेट अॅाफिसेस असल्याने वाहनांची संख्या खूप वाढली आहे. या सर्व वाहनांना सध्या एलफिन्स्टन रोड किंवा महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरील पुलांचा वापर करावा लागतो. त्यामुळे दोन्ही पुलांच्या आसपास प्रचंड वाहतूक कोंडी असते. नवीन पुलाच्या बांधकामासाठी लागणारा अवधी वाढल्याने वाहनधारकांना या वाहतूक कोंडीचा आणखी काही काळ सामना करावा लागणार आहे.



हेही वाचा -

धक्कादायक! एअर इंडियाच्या खाद्यपदार्थात झुरळ

मुंबईत फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा