मुंबईत फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) तज्ज्ञ पथकानं मे २०१८ ते जानेवारी २०१९ पर्यंत फ्लेमिंगोचं सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ झाल्याचं लक्षात आलं.

मुंबईत फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ
SHARES

हिवाळा सुरू झाला की गुजरात, सायबेरीया आणि आफ्रिकेतून फ्लेमिंगो पक्षी मुंबईत दाखल होतात. यावर्षी मुंबईत आलेल्या या पाहुण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. लांब पायाचे, गडद गुलाबी पंखाच्या रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांची मुंबई भागातील संख्या तब्बल १ लाख २१ हजारांवर पोहोचली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) तज्ज्ञ पथकानं मे २०१८ ते जानेवारी २०१९ पर्यंत फ्लेमिंगोचं सर्वेक्षण केलं. या शास्त्रीय सर्वेक्षणात फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ झाल्याचं लक्षात आलं. विशेष म्हणजे फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ झाल्यानं फ्लेमिंगो आणि मुंबईतील प्रदूषणाचा अभ्यास आणि आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रदूषणामुळे फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ?

गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पाणथळ जागी साधारण ऑक्टोबर ते मेपर्यंत येणाऱ्या फ्लेमिंगोचे थवे पक्षी-निसर्गप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय बनले आहेत. न्हावा शेवा, ठाणे, विटावा, नवी मुंबईतील खाडीजवळील पाणथळ ठिकाणी शेवाळे खाण्यासाठी जमलेल्या हजारो फ्लेमिंगोंचा थवा बघण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. त्याशिवय जगभरात प्रदूषित भागात फ्लेमिंगोंचा वावर मोठ्या प्रमाणात आढळत असून फ्लेमिंगोचं मुख्य अन्न शेवाळं आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषणामुळे फ्लेमिंगो संख्येत वाढ झाली आहे का? असा प्रश्न तज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र काही तज्ज्ञांनी हा दावा खोडून काढला आहे. प्रदूषण असलेल्या ठिकाणीही यशस्वीपणे जगण्याचं कौशल्य असल्यानं फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ होत असल्याचं काहींचं मत आहे.


फ्लेमिंगोचे यशस्वी सर्वेक्षण 

फ्लेमिंगो पक्ष्यांची गणना करणं कठीण असतानाही 'बीएनएचएस'चे सहाय्यक संचालक राहुल खोत आणि त्यांच्यासोबतच्या २० सहकाऱ्यांनी हे आवाहन यशस्वीपणे पेलले. जानेवारीमध्ये केलेल्या या सर्वेक्षणातून लेसर फ्लेमिंगो प्रजातीची संख्या वाढत आहे. पण ग्रेटर फ्लेमिंगो प्रजातीची संख्या कमी होत असल्याचं स्पष्ट झालं. हे सर्वेक्षण विटावा खाडी ते शिवडी आणि विटावा ते जेएनपीटीपर्यंतच्या पट्ट्यात एक किमी अंतरानुसार ट्रान्झेक्ट पद्धतीनं करण्यात आलं.


फ्लेमिंगोचे सर्वेक्षण करतानाच परिसंस्था, परिसरातील विकासाचा होणारा परिणाम, खाद्य आदींचाही अभ्यास करण्यात आला. यातून फ्लेमिंगोची संख्या वाढत असून त्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं मोजणी करण्याची गरज आहे.

राहुल खोत, सहाय्यक संचालक, बीएनएचएस


अशी आहे आकडेवारी 

लेसर फ्लेमिंगो 

महीना 
फ्लेमिंगो संख्या 
मे २०१८
१६ हजार ७००
ऑक्टोबर २०१८
२० हजार ९००
नोव्हबर २०१८ 
२९ हजार १००
डिसेंबर २०१८
 ३६ हजार १००
जानेवारी २०१९
१ लाख ७७ हजारसंबंधित विषय