पवई अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या मुलाचाही मृत्यू

Powai
पवई अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या मुलाचाही मृत्यू
पवई अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या मुलाचाही मृत्यू
See all
मुंबई  -  

पवई येथील शाळकरी मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणाला मोठा झटका बसला आहे. या अत्याचाराचा बळी ठरलेल्या १३ वर्षीय मुलाचा रूग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. लैंगिक अत्याचारानंतर या मुलाने आत्मत्येचा प्रयत्न केला होता, ज्यात त्याचं यकृत निकामी झालं होतं. सकाळी साडेचार वाजता केईम रुग्णालयात या मुलाने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली.   

दरम्यान, या प्रकरणी ज्या दुसऱ्या मुलावर शारीरिक अत्याचार झाले होते, त्याचा मृतदेह तहसीलदारांच्या उपस्थितीत गौतम नगर येथील दफनभूमीतून बाहेर काढण्यात आला. "आम्ही या मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून जे. जे. रुग्णालयात त्याचं शवविच्छेदन केलं जाईल" अशी माहिती झोन १० चे डीसीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. 

 

काय आहे नक्की प्रकरण?

पवईत राहणारे सुमित(१३) आणि सय्यद(११) (बदलेली नावं) हे दोघेही मित्र असून एकत्र क्लासला जात असत. 6 जुलैच्या आधी या दोघांसोबत असं काही झालं की दोघांनीही क्लासला जाणं बंद केलं. दोघं आपल्या घरातदेखील जास्त बोलत नसत. घरच्यांना काही समजण्याच्या आतच १२ तारखेला या दोघांनीही टोकाचं पाऊल उचललं. दोघांनी फ्रुटीमध्ये उंदीर मारण्याचं औषध घालून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

विष पिताच त्याचा परिणाम जाणवू लागला. दोघांनाही उलट्या व्हायला सुरुवात झाली. सुमितला सायन रुग्णालयात नेण्यात आलं, तर सय्यदला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र दुसऱ्याच दिवशी सय्यदचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे ११ वर्षीय मुलाचा मृत्यू होऊनदेखील त्याच्या कुटुंबीयांनी कोणताही आक्षेप न घेता परस्परच त्याला दफन करून मोकळे झाले. इथे सुमित मात्र मृत्यूशी झुंज देत होता. 

विष प्यायल्यामुळे सुमितचं यकृत संपूर्ण निकामी झालं होतं. जवळपास ११ दिवस त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. पण अखेर मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. सुमितने मृत्यूपूर्वी आपल्या आईला त्याच्यावर झालेल्या शारीरिक अत्याचाराची माहिती दिली होती. त्यानंतर आईच्या तक्रारींवर पवई पोलीस ठाण्यात बलात्कार, तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी सुमितने जाहीद नावाच्या एका इसमाचा उल्लेख केला होता. सुमितच्या वैद्यकीय चाचणीत त्याच्यावर शारीरिक आत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं होतं.  

पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत, पण अद्याप या प्रकरणात त्यांना कोणतंही यश मिळालेलं नाही. त्यातच आता सुमितच्या मृत्यूनंतर या गुन्ह्याचा तपास आणखीनच कठीण होऊन बसला आहे.हेही वाचा

पवईमध्ये दोन चिमुरड्यांवर बलात्कार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.