लैंगिक शोषणाने 2 मुलांचा बळी, वैद्यकीय तपासणीत उघड

 Mumbai
लैंगिक शोषणाने 2 मुलांचा बळी, वैद्यकीय तपासणीत उघड
Mumbai  -  

मुंबईत अल्पवयीन मुलींप्रमाणेच अल्पवयीन मुलांवर देखील अनैसर्गिक अत्याचार होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. या अनैसर्गिक अत्याचारांमुळे पवईत दोन मुलांनी चक्क विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती वैद्यकीय तपासणीतून उघडकीस आली. या मुलाची वैद्यकीय तपासणी झाली तेव्हा प्रथमदर्शनी त्याच्या गुप्तांगावर डॉक्टरांना जखमा आढळल्या. गंभीर बाब म्हणजे जो मुलगा केईम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता त्या दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. यापूर्वी दुसऱ्या मुलाचा 13 जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्याला आधी स्थानिक डॉक्टरांकडे आणि मग जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.

जवळपास 15 दिवसांपूर्वी पवईत राहणाऱ्या दोन मुलांवार शारीरिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच या दोन्ही मुलांनी आत्महत्या करण्याचा विचार केला आणि उंदीर मारण्याचे औषध फ्रूटीत मिसळून प्यायले. यात 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून दुसरा मुलगा अजूनही मृत्यूशी झूंज देत आहे. विशेष म्हणजे, ज्या 11 वर्षांच्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला, त्याच्या वडिलांनी मात्र त्यांना कोणतीही तक्रार द्यायची नसल्याचे संगितल्याने पोलिस देखील संभ्रमात आहेत.


या प्रकरणी आईच्या जबाबावरून आम्ही अनैसर्गिक अत्याचार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेण्यासाठी चार पथकं तयार केली आहेत.

नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त, झोन 10


नेमके झाले काय?

एकाच परिसरात रहाणाऱ्या या दोन्ही मित्रांचे वागणे 6 जुलैपासून अचानक बदलले होते. त्यांनी क्लासला जाणे देखील बंद केले होते. दोघांचे अभ्यासात लक्ष नसल्याची तक्रार ट्यूशन टीचरने मुलाच्या वडिलांकडे केली होती. मात्र नेमका काय प्रकार आहे ते त्यांना समजू शकले नाही.

12 जुलैला अचानक दोघांना उलट्या सुरू झाल्या. रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर वडिलांना संशय आला. त्यांनी आपल्या मुलाला विचारल्यानंतर जे समजले ते अत्यंत धक्कादायक होते. ते म्हणजे तो उंदीर मारण्याचे औषध प्यायला होता. त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला आधी सायन आणि नंतर केईम रुग्णालयात दाखल केले. अजूनही या मुलाची प्रकृती गंभीर आहे. दुसऱ्या मुलाला आधी स्थानिक डॉक्टरांकडे आणि मग जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. पण 13 जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे आपल्या मुलाचा मृत्यू होऊन देखील त्याच्या वडिलांना कोणतीही शंका आली नाही. ते आपल्या मुलाला दफन करून मोकळेही झाले. यासाठी डॉक्टरांनी देखील त्यांना डिहायड्रेशनने मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देऊन एका अर्थी त्यांना मदतच केली, असेच म्हणावे लागेल.

जो मुलगा केईम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे तो सतत एका जाहिद नावाच्या व्यक्तीचे नाव घेत असून या जाहिदने एका बंद खोलीत त्याच्यावर शरीरिक अत्याचार केल्याचे त्याने आपल्या आईला सांगितले. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.


फ्रुटीतून प्यायले विष

रुग्णालयात मृत्यू शी झुंज देणाऱ्या मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या दोन्ही मुलांनी फ्रुटीमधून उंदरांना मारण्याचे औषध घेतले. सुरुवातीला त्या दोघांनी हे औषध खाण्याचा प्रयत्न केला मात्र ते कडू लागल्यानंतर त्यांनी फ्रुटीमध्ये टाकून ते औषध प्यायले.


काही महत्त्वाचे प्रश्न...


  • 11 वर्षांच्या मुलाचा अचानक मृत्यू होऊन देखील त्याचे कुटुंबिय एवढे शांत कसे?
  • अचानक उलट्या होऊन मुलाचा मृत्यू होतो. डॉक्टरांना यात काहीही संशयास्पद का वाटत नाही? डॉक्टर एवढ्या निर्धास्तपणे मृत्यूचा दाखला देतात तरी कसे?
  • रुग्णालयात पोलिस देखील असतात, त्यांना यात काहीही संशयास्पद का वाटले नाही?
  • हॉस्पिटलमध्ये असलेल्या मुलाच्या मेडिकलमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर येऊन देखील मृत पावलेल्या मुलाचा मृतदेह खणून काढण्याचे कोणतेही प्रयत्न पोलिस का करत नाहीत?
  • पोलिस आरोपीचा शोध कधी घेणार?
हेही वाचा -

पवईमध्ये दोन चिमुरड्यांवर बलात्कार, एकाची विष पिऊन आत्महत्या

अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, नराधम ताब्यात


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments