अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, नराधम ताब्यात

 Kurar Village
अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, नराधम ताब्यात

मालाडच्या कुरार परिसरात एका अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप एका तरूणावर लावण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विक्रम झगडे (25) असे या तरुणाचे नाव असून,पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहिती कुरार वैश्यपाडा येथे राहणाऱ्या विक्रमने त्याच्या शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलास फूस लावून एका विरळ ठिकाणी नेले आणि त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले असा आरोप या अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांनी लावला आहे. जेव्हा हा सगळा प्रकार मुलाने घरच्यांना सांगितला तेव्हा या नराधमाचा भांडाफोड झाला. या नराधमाला 377 कलमाखाली अटक करण्यात आली असून, त्याला कोर्टाने 3 दिवसांची शिक्षा ठोठावली आहे.

Loading Comments