फायर सिस्टिमची पाइपलाइन पडून एक ठार

 Ghatkopar
फायर सिस्टिमची पाइपलाइन पडून एक ठार
फायर सिस्टिमची पाइपलाइन पडून एक ठार
फायर सिस्टिमची पाइपलाइन पडून एक ठार
See all

घाटकोपर - घाटकोपर पश्चिम परिसरातील वाधवा कॉम्पलेक्सच्या बेसमेंट पार्किंगमधील आग विझवणाऱ्या यंत्रणेची पाइपलाइन अचानक तुटून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे. पाइप पडल्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या तीस गाड्यांचंही नुकसान झालं. ही घटना शनिवारी सकाळी 8 वाजता घडली होती. त्यामध्ये सुरक्षारक्षक जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिल्डर आणि अग्निशमन कंत्राटदारावर गुन्हा दाखल झालाय. या अपघाताचं नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे.

Loading Comments