तलावात बुडून वृद्धाचा मृत्यू

मुलुंड - जलतरण तलावात पोहताना एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुलुंड (प.) मध्ये बुधवारी घडली आहे. मृत व्यक्तीचं नाव अंजनी एन. अंनतरामन (61) असं आहे. त्यावेळी तिथे असलेल्या लाईफगार्डने तातडीने त्यांना बाहेर काढले. त्यानंतर अंजनी यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यासंदर्भात तपास सुरू असून हृदयविकाराच्या झटक्याने अंजनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती सहपोलीस निरीक्षक दिनेश बागुल यांनी दिली आहे. अनंतरामन हे मुलुंडच्या सिटी ऑफ जॉयमधील रहिवासी होते.

Loading Comments