मस्जिद बंदरमध्ये वृद्धाची हत्या

 Pali Hill
मस्जिद बंदरमध्ये वृद्धाची हत्या

मस्जिद - घरात एकट्याच राहणाऱ्या एका वृद्धाची शनिवारी हत्या करण्यात आलीय. इक्बाल दरवेश (72) असं या वृद्धाचं नाव आहे. इक्बाल यांच्या घरातलं सामान गायब असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने त्यांची हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय त्यांचे दोन्ही हात-पायही बांधलेल्या अवस्थेत होते. याप्रकरणी पायधुनी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments