लाचखोर वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला अटक


लाचखोर वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला अटक
SHARES

ऐकीकडे पोलिस दलातील कर्मचारी वर्गात सुरू असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी न्यायालयात सांगतात. आणि दुसरीकडे हेच अधिकारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याची बाब उघडकीस आली आहे. माहीम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकास त्यांच्या ऑडर्लीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.


५० हजारांची मागितली लाच

माहीम पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बारवर पोलिसांनी रात्रभर कारवाई करत बार मॅनेजरसह काही जणांना ताब्यात घेतलं खरं. मात्र वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद इडेकर यांनी त्या ताब्यात घेतलेल्या मॅनेजरवर कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडून ५० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे मॅनेजरने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली.  

दोघांना रंगेहाथ अटक

तक्रारदार मॅनेजरने तडजोड करत लाचेची रक्कम २० हजारावर आणली. त्यानुसार लाचेचा पहिला हप्ता देण्यासाठी मॅनेजर गेला असताना. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिलिंद इडेकरसह सहाय्यक पोलिस शिपाई संदीप तेली या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकार्यांनी सांगितलं.

पोलिस दलात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात असे आदेश यापूर्वीच न्यायालयाने दिले आहे. मात्र तरीही भ्रष्टाचाराला लागलेली किड दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. इडेकर आणि तेलीसारख्या भ्रष्ट अधिकार्यांमुळे मुंबई पोलिसांचे नाव बदनाम होतना दिसत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा